Ad will apear here
Next
नवले महाविद्यालयातर्फे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर


लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. हे शिबिर मावळ तालुक्यातील गोवित्री ग्रामपंचायत येथे झाले.



या शिबिरामध्ये दोन्ही महाविद्यालयांचे मिळून शंभरहून जास्त स्वयंसेवक सहभागी झाले होते. शिबिराग्राम सर्वेक्षण, ग्रामस्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, गावातील संपूर्ण ग्रामस्थांसाठी मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप उपक्रम, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या कर्तृत्वाविषयक व्याख्यानमाला, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, लोक जागृती अभियान, व्यसनमुक्ती व पर्यावरण रक्षण व संवर्धन यांविषयी पथनाट्ये, शालेय विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले.



या शिबिरासाठी संकुलाचे संचालक डॉ. माणिक गायकवाड, एन. बी. नवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई, श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद रोहकले यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी एन. बी. नवले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. सतीश सोनवणे व काशीबाई नवले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. सुहास चव्हाण, एन. बी. नवले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी सुरज मानकर व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी कमलेश भवर यांचे मेहनत घेतली.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZKPBW
Similar Posts
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’मध्ये मतदार जागृती दिन साजरा लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या लोणावळा कॅंपसमध्ये सात महाविद्यालयांच्या वतीने मतदार जागृती दिन साजरा करण्यात आला.
‘सिंहगड’मध्ये माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणींत कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कुसगाव येथील एस.के.एन. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ने दिलेल्या ज्ञान व कौशल्याच्या शिदोरीवरच मार्गक्रमण करत असल्याचे सांगून ‘सिंहगड’विषयी कृतज्ञता व्यक्त केली
‘सिंहगड’मध्ये पुलवामातील शहीदांसाठी कॅन्डल मार्च कुसगाव : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिंहगड लोणावळा कॅम्पसच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व प्राचार्यांनी उत्स्फूर्तपणे कॅन्डल मार्च काढला.
सिंहगड लोणावळा संकुलमध्ये शिवजयंती उत्साहात कुसगाव : येथील सिंहगड लोणावळा संकुलामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language